breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगलने आणली युजर्ससाठी ‘Meena’… हव्या तेवढ्या वेळ तिच्याशी गप्पा मारता येणार…

गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं त्याचं नाव आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा, गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅपल सीरीसारखे व्हॉईस असिस्टेंट खूप लोकप्रिय आहेत. बातम्या देणं, हवामानाची माहिती सांगणं, गाणी ऐकवणं यासह अनेक गोष्टींसाठी अशा डिव्हाईसचा वापर हा केला जातो. मात्र आता गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं तिचं नाव आहे. मीनासोबत म्हणजेच या चॅटबोटसोबत युजर्सना हवा तेवढा वेळ मनसोक्त गप्पा मारता येणार आहे. तसेच ही चॅटबोट देखील एखाद्या माणसासारखं त्याला उत्तर देईल असं गुगलने म्हटलं आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सोशल मीडिया चॅटच्या आधारावर मीना ही चॅटबोट तयार करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर संवाद म्हणजेच गप्पा मारता येणार आहे. तसेच गप्पांसोबतच मीना जोक देखील सांगणार आहे. मात्र युजर्ससाठी ही नवी चॅटबोट कधी येणार आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मीनाला 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत. इतर चॅटबोटपेक्षा मीना ही नवी चॅटबोट अधिक चांगली असल्याचा दावा गुगलने केला आहे.

मीनामध्ये सिंगल इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर इनकोडर आणि 13 इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर डीकोडर बॉक्स देण्यात आले आहेत. म्हणजेच सिंगल इनकोडर मीना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मदत करणार आहे तर 13 डीकोडर त्याचं उत्तर तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. गुगलने मीनाची चाचणी करण्यासाठी एक मापदंड तयार केला असून सेन्सबलनेस अँड स्पेसिफ़िसिटी ऐवरेज (SSA) असं नाव दिलं आहे. या मापदंडातून एखाद्याला प्रतिक्रिया देण्यासाठी संभाषण करणाऱ्या एजंटची काय क्षमता आहे ते तपासलं जातं. SSA टेस्टमध्ये सामान्य माणसांना 86 टक्क्यापर्यंत रँकिंग मिळतं तर मीनाला यामध्ये 79% गुण मिळालेत. पण ही गुगलची स्वत:ची प्रणाली आहे.

तर गुगलने आणलेलं हे डिव्हाईस आहे तर खरच भन्नाट … नाव पण भारी ठेवण्यात आलं आहे… आता ही मीना  सर्वांची चांगली मैत्रिण होऊ शकेलं का हे पाहण म्हत्त्वाच ठरणार आहे…कारण मिनाला कॉम्पिटिशन साठी  अ‍ॅलेक्सा आहेच..त्यामुळे मीना किती लोकांच्य पसंतीस उतरतेय हे पाहण खरंच खूप इनट्रेस्टिंग ठरणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button