Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खासदारांनो दुसऱ्याच्या जागेवर गेलात तर याद राखा…; लोकसभाध्यक्ष भडकले

नवी दिल्ली | लोकसभेमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला धक्काबुक्की झाल्याने काल खळबळ उडाली. यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. यावर भाजपाच्या खासदारानेही विरोधी तक्रार केली. या साऱ्या प्रकारावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांनी दिल्ली हिंसाचारावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. तर अध्यक्ष प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करण्यास सांगत होते. मात्र, गोंधळ शमत नसल्याने अध्यक्षांनी खासदारांना पूर्ण अधिवेशन निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

जर कोणताही खासदार त्याची जागा सोडून दुसऱ्या खासदाराच्या जागेच्या आसपास जरी फिरकला तरी त्याचे निलंबन होणार हे लक्षात ठेवावे, अशी तंबीच बिर्ला यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button