खबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-54.jpg)
कोरोनाच्या संकट संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरही आलं आहे. खबरदारी म्हणून निर्धारित वेळेपूर्वी अधिवेशन संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत काम करायचे होते, पण संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो, असे दोन्ही अधिका-यांनी सांगितले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1586203375-2491.jpg)
अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करण्यात येत आहे. शनिवारपासून अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करणा-या पत्रकारांना सरकारने डेली अँटीजन टेस्टदेखील अनिवार्य केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सचिवांनी कामकाज कमी करण्याशी संबंधित प्रश्नांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. कोरोना संसर्ग झालेल्या खासदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरींचा समावेश आहे.
दुसरीकडे राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सांगितले की, परीक्षा हॉलमध्ये चिठ्ठ्या आदान-प्रदान करण्यास परवानगी नाही. परंतु कोरोना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने वरिष्ठ सभासद सदस्य एकमेकांशी संपर्क साधू शकतात. सभा सुरू झाल्यावर सभागृहात बसलेल्या अधिका-यांकडे कोणत्याही स्पष्टीकरणासाठी येऊ नये. तसेच त्यांनी एकमेकांच्या सदस्यांच्या जागेवर जाऊ नये, असा सल्ला नायडू यांनी वरच्या सभागृहातील सदस्यांना दिला. तसेच कोणतीही समस्या आवश्यक असल्यास आपण आपली चिठ्ठी पाठवू शकता असही त्यांनी सांगितले आहे.