breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे कोविड सेंटरमध्ये रंगला चक्क फुटबॉल सामना

कोल्हापूर – कोरोनामुळे एकीकडे जगभरातील सगळ्याच क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. एवढेच काय तर ऑलम्पिकच्या स्पर्धासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे कोविड केअर सेंटरमध्येच चक्क फुटबॉलचा सामना रंगलेला पहायला मिळाला. ज्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच सेंटरमध्ये दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी फुटबॉलचा सामना खेळला.

कोल्हापूरमधील या कोविड केअर सेंटरमधील फुटबॉल मॅचचा व्हिडीओ सध्या संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक संबंधित रुग्णांना कोरोना संसर्ग झालेला असतानाही त्याचे दडपण न घेता फुटबॉल खेळत आनंद घेतल्याचे म्हणत आहेत. तसेच त्यांच्या या कणखरपणाचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे या रुग्णांनी शारीरिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करुन खेळल्याने त्यांना कोरोना संसर्गाचे गांभीर्य नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

पन्हाळा तालुक्यात आतापर्यंत एकूण १८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ११२ सक्रिय कोरोना रुग्णांना वाघबिळ येथील एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. या एकूण ११२ रुग्णांमध्ये वृद्धांसह तरुण वयातील मुलांचाही समावेश आहे. येथील बहुतांश रुग्णांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. सर्वजण ठणठणीत बरे असल्याचे स्वतः रुग्ण सांगत आहेत.

वाघ बीडमधील या कोविड केअर सेंटरमधल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी पोर्ले आणि कोतोली गावातील रुग्णांचे २ संघ तयार केले. यानंतर पोर्ले विरुद्ध कोतोलीकर अशा रंगलेल्या सामन्याचा सर्वांनीच आनंद घेतला. यामुळे संबंधित कोरोना रुग्णांच्या मनावरील ताण काहीसा हलका झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button