Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापुरात 15 दिवस नो एण्ट्री
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. दोन हजारांचा टप्पा ओलांडल्याने सोमवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील 15 दिवस कोल्हापुरात अन्य जिल्ह्यातील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ई-पास तातडीने बंद करण्यात आले असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
कोल्हापुरात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. यामुळे येत्या दोन आठवड्यात जिल्ह्यात कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती कोल्हापूर क्षेत्रातील (आधारकार्ड पत्त्यानुसार) असेल तरच परवानगी देण्यात येईल.