breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना व्हायरसचे इराणमध्ये थैमान,मृतांचा आकडा आता 611 वर

कोरोना व्हायरसने इराणमध्ये थैमान घातलं आहे. इराणमध्ये शनिवारी कोव्हिड-19 आजारामुळे 97 मृत्यूंची नोंद झाली.यामुळे इथं कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा आता 611 वर पोहोचला आहे.

आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 हजार 729 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.गेल्या बुधवारी इराणमधील सॅटेलाईट फोटो समोर आले होते. त्यामध्ये मृतांना दफन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खणले जात असल्याचंही म्हटलं जातय.

इराणमधल्या प्रत्येक प्रांतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अवघे विशीतल्या काही डॉक्टरांनाही याचा संसर्ग झाला आहे. शवागारांमध्ये मृतांचा खच पडल्याचे व्हीडिओही समोर आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button