breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना नियंत्रणासाठी बायडेन यांचा पहिल्याच दिवसापासून असणार ॲक्शन प्लॅन

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांनी बाजी मारली आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी बायडेन यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. कोरोना नियंत्रणासाठी बायडेन यांचा पहिल्याच दिवसापासून ॲक्शन प्लॅन असणार आहे. 

बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शुक्रवारी रात्री संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मतमोजणी प्रक्रियेवर ट्रम्प यांनी जोरदार आरोप करत न्यायालयात धाव घेतली. मात्र, दोन राज्यातील आरोप न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे देशात तणाव वाढला आहे. आम्ही प्रतिस्पर्धी आहोत. एकमेकांचे शत्रू नाही. अमेरिकेतील लोकांना देश एकजूट हवा आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्था आणि वर्णद्वेष आदी समस्यांविरोधात लढण्यासाठी लोकांनी मला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, व्हाईट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 इलेक्टोरल कॉलेज व्होटमध्ये 270 व्होट प्राप्त करणे गरजेचे आहे. बायडेन यांना 264 इलेक्टोरल व्होट मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button