कोरोनामुळे स्पर्धा परिक्षा स्थगित,आदित्य ठाकरेंच ट्विट
कोरोनाने सध्या राज्यात थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कडक पावले उचलली आहेत. शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्यानंतर आता एमपीएससीच्या परीक्षांबाब तही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या खंड २,३ आणि ४ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याचे एक पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ३१ मार्च २०२० पर्यंत राज्य पातळीवरील घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशा सूचना संबंधितांच्या मान्यतेने देण्यात आली असून याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे. या वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.