breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच आता कोरोनाच्या नव्या प्रकाराने आणखी खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. तर ब्रिटन सरकारला पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. वेगाने पसरत असलेल्या या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले आहे. दरम्यान, ब्रिटनसह नेदरलँड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचे बीबीसीने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने म्हटले आहे. तर कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सतर्क झाला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button