केरळमध्ये ‘करोना’चा तिसरा रुग्ण आढळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Corona-Virus.jpg)
तिरुवअनंतपुरम | महाईन्यूज
भारतात करोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये करोना विषाणूची लागण झालेला हा आतापर्यंतचा तिसरा रुग्ण ठरला आहे. याआधी चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झालेली होती. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. चीनमधून परतलेल्या भारतीयांना स्वतंत्र कक्षात ठेवण्याची केंद्र सरकारने सूचना केली असून चीनला जाणे टाळण्याचेही केंद्र सरकारने आवाहन केलेले आहे.
चीनहून काही दिवसांपूर्वी परतलेल्या केरळमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. करोना विषाणूची लागण झालेला हा भारतातील दुसरा रुग्ण होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रुग्णाला करोना विषाणूची लागण झाली आहे. त्याला रुग्णालयातील विशेष विभागात ठेवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. केरळमध्ये याआधीही करोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला होता.