breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा वेग जरी काही प्रमाणात मंदावला असला तरी, कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. गेल्या दिवसांपुर्वी ते दिल्ली दौऱ्यावर होते आणि तेव्हापासूनच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळत होती. त्यांनी आज त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आरिफ यांना स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात लिहले आहे की, ‘मी कोरोनाची लागण केली असता, त्यात माझा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठणठणीत असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी विलगीकरणात जात आहे. मागील आठवड्यात माझ्यासोबत दिल्लीतील मिटींगमध्ये जे कोणी सहभागी झाले होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’ असे आवाहन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button