Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारने वाहतूक नियमामत केले महत्त्वपूर्ण बदल; वाहन चालवताना मोबाईल वापरास सवलत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/traffic.gif)
नवी दिल्ली: केंद्र सरकारने वाहतूक नियमामत महत्त्वपूर्ण बदल करत वाहन चालवताना नियम व अटींचे पालन करुन मोबाईल वापरास परवानगी दिलेली आहे. नव्या नियमानुसार वाहन चालवतान नेविगेशन म्हणजेच रस्ता पाहण्यासाठी (दिशा, मार्ग) मोबाईलचा वापर करता येणार आहे. मात्र, मोबाईल वापरताना चालकाला वाहनावरील ताबा सुटणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे लागमार आहे. दरम्यान, वाहन चालवताना फोनवर बोलण्यास मात्र मनाई कायम ठेवण्यात आली आहे. वाहन चालवताना चालक जर मोबाईलवर बोलताना आढळला तर 1 ते 5 हजार रुपयांचा दंड आकारण्याचे प्रावधान या नियमांमध्ये आहे.