breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काश्मिरात बर्फवृष्टीमुळे चार दिवसांपासून रस्ते, विमाने बंद; शेकडो पर्यटक अडकले

श्रीनगर – काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांना बर्फवृष्टीची प्रचंड उत्सुकता असते. परंतु कधी कधी ही बर्फवृष्टी समस्या ठरते. रविवारी काश्मीरमध्ये १० इंचांपर्यंत बर्फ साचला होता. श्रीनगर शहरातही ३ ते ४ इंचांपर्यंत बर्फ साचला होता. त्यामुळे खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. ३ जानेवारीपासून श्रीनगरहून विमान उड्डाणे रद्द झाली. ३०० किमी लांब जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे हजारो पर्यटक पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगरमध्ये अडकले आहेत.

वाचा :-पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या रेवारी-मदार भागाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

दल सरोवराच्या परिसरातील हाऊसबाेट मालक रस्ते-हवाई मार्ग पुन्हा सुरू होईपर्यंत पर्यटकांना राहण्याची मोफत सुविधा देत आहेत. दुसरीकडे खोऱ्यातील जनजीवनावर बर्फवृष्टीचा प्रभाव पडला आहे. शेकडो घरांची हानी झाली आहे. कुलगाम भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे बुधवारी २२ कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दक्षिण काश्मीरच्या एका शाळेत त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. श्रीनगरच्या हजरतबल भागात बर्फवृष्टीमुळे एक छत कोसळले. त्यात सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू झाला. उत्तर काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत एका महिलेचा मृत्यू झाला. दिल्ली-एनसीआर भागात गुरुवारपासून पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button