काश्मिरच्या शोपियानमध्ये चकमक सुरूच, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
![Fighting continues in Shopian, Kashmir, two terrorists strangled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/shopiyan.jpg)
शोपियान – काश्मिरचे खोरे अद्यापही दहशतवाद्यांच्या सावटाखाली आहे. शोपियान जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळापासून चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच, तेथील भागात अजूनही चकमक सुरूच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.
येथील कनिगाम या गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांकडून परिसरास वेढा देण्यात आला व शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. त्यानंतर जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने चकमक सुरू झाली.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून, जवानांकडून परिसरात फ्लड लाईट्स देखील लावले गेले. यानंतर चकमक सुरूच राहिली दरम्यान आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.