breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कामदारांचा अपमान करणे ही नामदारांची सवयच – नरेंद्र मोदी

दिल्ली – चौकीदारांची माफी मागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज होळीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमे अंतर्गत देशभरातील २५ लाख चौकीदारांशी ऑडिओ संवाद साधला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत देशातील कामदारांचा अपमान करणे ही नामदारांची सवयच असल्याची टीका त्यांनी केली. चौकीदार हा शब्द आपण स्वीकारला असल्याचे सांगून,मागील काही दिवसांपासून चौकीदार हाच शब्द सर्वत्र चर्चेत असल्याचे सांगितले. टीव्ही, सोशल मीडिया, देशातच नाही तर विदेशात, आज प्रत्येक भारतीय ‘मैं भी चौकीदार’ असे म्हणत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्स सोबत झालेल्या राफेल विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत ‘चौकीदार चोर हे’ अशी टीका केली होती. त्यामुळे याच टीकेला आपले प्रभावी हत्यार बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोशल माध्यमांवर आपले नाव बदलत नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्दप्रयोग केला होता. तसेच सोशल माध्यमांवर भाजपाने ‘मे भी चौकीदार’ अभियान राबवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button