breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कर्नाटक पोटनिवडणूक : काँग्रेस-जेडीएसचा जल्लोष, भाजपाला फटका

कर्नाटकात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीला मोठं यश मिळालं आहे. भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. शनिवारी इथे मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा होती. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.

– रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जे़डीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी १ लाख ९ हजार १३७ मतांनी विजयी झाल्या आहेत. अनित कुमारस्वामी यांना १ लाख २५ हजार ४३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराला फक्त १५ हजार ९०६ मते मिळाली. अनिता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.

ANI

@ANI

: JDS’ Anitha Kumaraswamy wins Ramanagaram assembly seat with a margin of 109137 votes and Congress’s AS Nyamagouda wins Jamkhandi assembly seat by a margin of 39480 votes pic.twitter.com/6SxNEhDbk7

– जमाखांदी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आनंद एस नयामगौडा ३९,४८० मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांना ९६ हजार ९६८ मते मिळाली तर भाजपा उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांना ५७,४९२ मते मिळाली.

– बल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा दीडलाख मतांनी आघाडीवर आहेत. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी, श्रीरामुल्लू यांनी बल्लारीमधून केलेले विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. इथे भाजपाला मोठा फटका बसेल.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Karnataka: JD(S) workers celebrate in Ramanagaram. JDS’ Anitha Kumaraswamy is leading by 1,00,246 votes in the assembly seat. Congress-JD(S) alliance is leading on 4 out of 5 seats in

– शिवमोगा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार आघाडीवर आहे. भाजपा उमेदवाराला १लाख ९२ हजार ०९६ मते तर जेडीएस उमेदवाराला १ लाख ७३ हजार ७५५ मते मिळाली आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Karnataka: Congress members and workers celebrate outside party office in Bengaluru. Congress-JD(S) alliance is leading on 4 out of 5 seats in

– मांडया लोकसभा मतदारसंघात जेडीएस उमेदवार १,१८,३३० मतांनी आघाडीवर आहे. भाजपा उमेदवाराला फक्त ७१ हजार मते मिळाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button