कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार
भोपाळ | मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कमलनाथ यांची 20 मार्च रोजी भोपाळ येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या पत्रकारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत किमान 200 पत्रकार उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.
पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यासोबत पत्रकार परिषदेतील उपस्थित नेत्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत कमलनाथही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे. “पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच कमलनाथ यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे”, अशी माहिती कमलनाथ यांचे पीआर नरेंद्र सलूजा यांनी दिली.