Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कपड्याच्या गोदामाला भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू, तर तीन जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/FIRE-DEAD-CLOTH-HOUSE-Frame-copy-2.jpg)
दिल्ली | महाईन्यूज
दिल्लीच्या किराडी भागात मध्यरात्री एका कापड गोदामाला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते मोठ्या प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.