औरंगाबादेतील समतानागर, भीमनगर भागात सापडले आणखी दोन कोरोनाग्रस्त
औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गुरुवारी आणखी दोन जणांची भर पडली. यात समतानागर आणि भीमनगर भागातील दोन महिलांचा समावेश आहे. यासोबतच, शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. या दोन्ही महिला आधीच कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइक आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांनी गुरुवारी दिली आहे.
औरंगाबादेत एकूण 40 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला. 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सध्या 19 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. समता नगर येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची 45 वर्षीय पत्नी आणि भीमनगर भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय मयत कोरोना बाधित महिलेच्या 45 वर्षीय नातलग महिलेचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, यावरूनच आता शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 40 झाली आहे. भीमनगर भावसिंगपुरा येथील कोरोनाबाधित महिलेच्या अत्यंसंस्काराता अनेक जण सहभागी झाले होते.
त्या सर्वांच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या. त्यापैकीच 34 जणांचे कोरोना रिपोर्ट गुरुवारी निगेटिव्ह आले आहेत. या प्रसंगी सहभागी झालेल्यांपैकी आतापर्यंत 50 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोरोनावर उपचार घेत असलेल्या शहरातील आणखी 7 जणांचे 12 व्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.