ऑन ग्राउंड प्रोडक्ट लाँच इव्हेंटचं आयोजन केलं जाणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-47.png)
जीवघेण्या करोना व्हायरसचा परिणाम चीनच्या बाहेरही दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळतोय. भारतातही या व्हायरसचे काही संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशात सहा जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून, संशयितांची संख्याही वाढली आहे. अशातच भारतीय स्मार्टफोन मार्केटमधील दिग्गज कंपनी शाओमीने आता या व्हायरसच्या फैलावामुळे एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
मार्च महिन्यामध्ये कोणत्याही ऑन ग्राउंड प्रोडक्ट लाँच इव्हेंटचं आयोजन केलं जाणार नाही. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंपनीने हा निर्णय घेतलाय. तसेच, RedmiNote मालिकेतील नव्या फोनच्या लाँचिंगचा इव्हेंटही लाइव स्ट्रीमद्वारे केला जाईल असंही कंपनीने स्पष्ट केलं. कंपनीने ट्विटरद्वारे ही माहिती दिलीये.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-14.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/212.png)
12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता शाओमीकडून Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीकडून माध्यमांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट 8 ची पुढील आवृत्ती असणार आहे.