breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ऑनलाईन गॅस बुकिंग करून करता येईल थोडी बचत

लॉकडाऊनमुळे सध्या महागाई वाढत असल्यानं अनेक गृहिणींचं आर्थिक गणित बिघडलं आहे. त्यातच भाज्यांचे दर वाढ वाढत आहेत .यामध्ये एक दिलासादायक असणारी बाब म्हणजे ऑनलाईन माध्यमातून गॅस बुकिंग करून आपण थोडी बचत नक्कीच करू शकणार आहोत. अवघ्या एका क्लिकवर गॅस बूक करता येऊ शकतो. अगदी मिस्ड कॉलवर देखील एलपीजी गॅस सिलेंडर बूक करण्याची सोय आहे. आणि ऑनलाईन गॅस बुकिंग सोबतच 50 रूपयांचा कॅश बॅक देखील दिला जात आहे.

अमेझॉन पे च्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडर्सचं बुकिंग केले तर तुम्हांला 50 रूपये कॅशबॅक मिळू शकतो. अमेझॉन पे वर ही कॅशबॅक ऑफर इण्डेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस कंपनींना सिलेंडर बुकिंगवर ही ऑफर देण्यात आली आहे.

कॅशबॅक ऑफर घ्यायची असेल तर तुम्हांला अमेझॉन अ‍ॅपच्या पेमेंट ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर गॅस सर्विस प्रोव्हायडर निवडावा लागेल. तेथे तुम्हांला रजिस्टर मोबाईल नंबर, एलपीजी नंबर समाविष्ट करण्याचा पर्याय मिळेल. मात्र यासाठी तुम्हांला अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट करावं लागणार आहे.

अमेझॉनची ही 50 रूपये कॅशबॅक ऑफर 31 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे. गॅस सिलेंडर बूक झाल्यानंतर तो तुमच्या घरी डिलिव्हर केला जाणार आहे. दरम्यान तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर उमंग अ‍ॅपच्या माध्यमातूनही बूक करू शकता. त्यावर तुम्हांला भारत, इंडेन आणि एचपी सह अन्य कंपनीचे देखील गॅस सिलेंडर बूक करण्याची सोय आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button