breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

उपराजधानीत व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा; १२ हजार रुग्ण आणि २९१ व्हेंटिलेटर्स

नागपूर – नागपूर शहरात व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे २९१ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या २९१ व्हेंटिलेटर्ससाठी अनेक रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. तर वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमावला लागला आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या ११ हजारच्या वर कोरोना रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. परंतु जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याने, अनेक रुग्ण व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा करत आहेत.

जिल्ह्यात ११ हजारच्या वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, रोज २ हजाराच्या आसपास रुग्ण वाढत आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवघे २९१ व्हेंटिलेटर्स आहेत. अनेकांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे पण परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाचे लक्ष दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button