breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

इन्स्टाग्राम आणले आपल्या युजर्ससाठी टिकटॉकसारखे काही खास फीचर्स…

सोशल मीडियावर सध्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. इन्स्टाग्रामने आपल्या बूमरँग इफेक्टमध्ये टिकटॉक अ‍ॅपसारखे काही खास फीचर्स अ‍ॅड केले आहेत. लेटेस्ट अपडेटनंतर आता यामध्ये स्लोमो, इको, डुओ आणि ट्रिमिंग ऑप्शन अ‍ॅड करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच आता इन्स्टा टिकटॉकला टक्कर देणार आहे.

इन्स्टाग्रामवर एखादा नवीन व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल किंवा लायब्ररीतून अपलोड करायचा असेल तर नव्या बूमरँग इफेक्ट्सचा वापर हा पहिल्यासारखाच केला जातो. इन्स्टाग्रामवर अ‍ॅपमध्ये कॅमेरा ओपन केल्यानंतर युजर्सना बूमरँगवर स्वाईप करावं लागेल. त्यानंतर नवीन इफेक्ट हे अ‍ॅपमध्ये दिसतील. मात्र यासाठी इन्स्टाग्रामचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन फीचर्समध्ये स्लोमोच्या मदतीने व्हिडीओ स्लो करता येतो. इको व्हिजन इफ्केट डबल होतो. तर डिओच्या मदतीने व्हिडीओ पहिलं स्पीड-अप आणि नंतर स्लो-डाऊन करता येतो…

इन्स्टाग्रामवर अपडेट मिळालेलं सर्वात उपयोगाचं व्हिडीओ ट्रिम करण्याचं फीचर आहे. याच्या मदतीने व्हिडीओ क्लिप्स छोट्या करता येतात. या नवीन अपडेटबाबत इन्स्टाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच अनेक डिव्हाईसमध्ये हे फीचर रोलआऊट करण्यात आलेले नाही. पण लवकरच सर्व युजर्सना हे अपडेट मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. इन्स्टाग्राम हाईड लाईक्स काउंट या फीचरवर काम करत असून पुढील आठवड्यात अमेरिकेत याची चाचणी घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ एडम मॉसरी यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडिया नेटवर्कने याआधी युजर्सवर त्यांच्या पोस्टला किती लाईक्स मिळाले आहेत याचा सतत एक दबाव असतो, तर त्यांच्या पोस्टवर कसे रिअ‍ॅक्शन येतील याच विचारात असतात यासाठीच लाईक काउंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button