breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना करोना व्हायरसची लागण

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. डीडी न्यूजने सुत्रांनी दिलेल्या वृतत्तानुसार याची माहिती दिली…, इटलीहून भारतात आल्यानंतर या 15 जणांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. दिल्लीत आल्यानंतर एम्समध्ये नमुन्यांची तपासणी केली असता सर्व जणांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे.

करोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये करोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणमध्ये करोनाचे रुग्ण आढळले होते. आता नाशिकमध्ये करोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका व्यक्तीमध्ये करोना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे

महाराष्ट्रात करोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले असून त्यांना मुंबई आणि पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे करोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचं तसंच एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं आहे.

“घाबरण्याची गरज नाही. आपल्याला एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्त्वपूर्ण पाऊल उचला”. असं मोदींनी ट्विट करत म्हटलंय…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button