breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 परदेशी तरुणी सापडल्यानंतर प्रकरण उघड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/hariyana-racket.jpg)
हरियाना: हरयाणाच्या पंचकुला जिल्ह्यात पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. पंचकुलातील सेक्टर 12 मध्ये हा व्यवसाय सुरू होता. 4 परदेशी तरुणींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे. 4 परदेशी तरुणींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/hariyana-racket-1.jpg)
या चारही तरुणींच्या व्हिजाही मुदत संपलेली आहे. पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. ज्यांनी या तरुणींना व्यवसाय करण्यास भाग पाडलेलं अशा चार दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. याचा सखोल तपास केला जातो आहे. याच्याशी संबंधित प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे.