breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इंग्लंडमध्ये लॉकडाऊन उघडताच कामावर येण्यासाठी रेल्वेत मोठी गर्दी

लंडन | इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोरोनामुळे एक दिवसात सर्वात कमी १७० मृत्यू झाले. इंग्लंडमध्ये २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला होता. त्या दिवशी काेरोनामुळे १८५ मृत्यू झाले होते. युरोपीय देशांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त ३४६३६ मृत्यू इंग्लंडमध्येच झाले आहेत. येथे २४३६९५ रुग्ण आहेत. सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत लोकांना कामावर येण्याचे सांगितले. यासाठी सोमवारपासून ३ हजार अतिरिक्त रेल्वे सुरू करण्यात आल्या. इंग्लंडमध्ये लॉकडाऊनदरम्यान रोज सुमारे १२ हजार रेल्वे धावत होत्या. त्या वाढवून १५ हजार करण्यात आल्या आहेत. अशा २४ हजार रेल्वे धावतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये सूट असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. यामुळेच लोक कामावर परतू लागल्याने त्यांच्यासाठी रेल्वेही कमी पडल्या. अतिरिक्त रेल्वेंमुळे केवळ १५ टक्के क्षमता वाढली. दरम्यान, द ऑब्झर्व्हर वृत्तपत्राच्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडमध्ये ४२ टक्के लोकांना वाटते की, सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले. तर ३९ टक्केे लोकांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले. तिकडे इंग्लंडच्या लगतच्या स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये कडक लॉकडाऊन आहे.

इटलीतही लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदा सर्वात कमी १४५ मृत्यू झाले. येथे १० मार्चला लॉकडाऊन सुरू झाले होते. त्या दिवशी सर्वात कमी १६८ मृत्यू झाले होते. इटलीत आतापर्यंत २२५४३५ रुग्ण आढळले आहेत. ३१९०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत बार, सलून, संग्रहालय, वाचनालये सुरू झाली. सोमवारपासून चर्चही उघडले, मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button