आयएनएक्स केस : चिदंबरम यांना जामीन, तरी राहावं लागणार जेलमध्ये
ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आयईएनएक्स केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काहीसा दिलासा दिला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयानं त्यांना जामीन दिला. या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय दोघेही करत आहेत. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना 24 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर येता येणार नाही.
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालय म्हणालं, पी. चिदंबरम यांना तुरुंगातून बाहेर जाता येईल, पण त्यासाठी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घ्यावा लागणार आहे. त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. इतर कोणत्याही प्रकरणात पी. चिदंबरम यांची गरज नसल्यास त्यांना जामीन मिळू शकतो. तसेच पी. चिदंबरम न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय ते देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणा जेव्हा पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी बोलावतील तेव्हा त्यांना यावंच लागेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.