Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
“आम्हालाही मदत करा”; पाकिस्तानचे भारतासमोर लोटांगण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Modi-Imran.jpg)
करोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला असून पाकिस्तानमध्येही थैमान घातला आहे. करोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान सरकारने आता भारताकडे मदत मागितल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसाठी मदत मागणाऱ्या देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानमध्ये करोनाचे सहा हजार रुग्ण सापडले असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे.