breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आता इथून पुढे ‘नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल’
देशभरातील अनेक जिल्ह्यांत २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या देखील नक्कीच वाढलेली पहायला मिळेलं… अशात देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता पेट्रोल पंपावर मास्क घातलेलं असल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली आहे.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ‘नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल’ हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशभरात लागू होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल पंपांचा समावेश आवश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.
पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्यांना मास्क घालणे अनिर्वाय आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एकमताने हा निर्णय घेतला आहे.