आज आहे 54 वा जागतिक साक्षरता दिन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ED6qUJYUYAAvxMe.jpg)
साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जगभरात होणार्या प्रयत्नांंपैकी एक म्हणजे आंंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा आजचा साक्षरता दिन. युनेस्को ने 7 नोव्हेंबर1965 रोजी बहुमताने निर्णय घेत 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरवलं होतं. यानुसार 1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
यंदाचा हा साक्षरका दिन साजरा करण्याचे 54 वे वर्ष आहे. मात्र दुर्दैवाने अनेकांंना याबाबत अजुनही फार माहिती नाही, अशावेळी निदान आपल्या परिवार, मित्रमंंडळी व नातेवाईकांंपर्यंत या दिवसाची माहिती पोहचवण्याचे काम किंवा त्यांना आठवण करून देण्याचे काम आपण नक्कीच करू शकतो.
दरम्यान, भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम चा समावेश होतो. तर उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश पिछाडीवर असलेल्या राज्यांमध्ये होतो. महाराष्ट्र या साक्षर राज्यांंच्या यादीत मधल्या स्थानी आहे.