breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आग्र्यातील 6 जणांना कोरोनाची लागण ; देशात आतापर्यंत 12 केसेस

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसचे 12 रुग्ण असल्याची पुष्टि झाली आहे. यात आग्र्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे, जे दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह म्हणाले की, “राज्यात आतापर्यंत सहा पॉजिटिव्ह केसेस आढळले आहेत. हे सर्वजण आग्र्यातील आहेत.

रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आम्ही सध्या विमानतळ आणि नेपाळच्या सीमाभागात लक्ष देत आहोत. अफवांवर विश्वास ठेवू नका.

दुसरीकडे इटलीवरुन आलेल्या 69 वर्षीय रुग्णाला कोराना झाल्याची पुष्टी एसएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर भंडारी यांनी केली आहे. सध्या त्या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल दिल्लीमधील इटली दूतावासाच्या संपर्कात आहे. या व्यक्तीसोबत इटलीमधील 18 जण भारत दौऱ्यावर आले होते.

तेलंगाणा आणि दिल्लीमध्ये सोमवारी एक-एक रुग्ण आढळले आहेत. सध्या त्या दोघांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत.

तेलंगाणा सरकार कोरोना पीडित रुग्णासोबत ज्या 25 जणांनी बस प्रवास केला होता, त्यांचीही तपासणी करत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, घाबरण्याची गरज नाहीये. यासाठी चांगल्या पद्धतीचे उपचार केले जातील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button