breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अहमदाबाद येथे तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमधील वटवा येथे केमिकल फॅक्टरीत आज मंगळवारी मोठी आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. २० पेक्षा जास्त अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ही आग रात्री लागली.

वाचा :-जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी

अहमदाबादच्या वटवामध्ये जीआयडीसी इंडस्ट्रीयल भागात तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली. अहमदाबादचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट्ट यांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहने तेथे पोहोचली होती, आता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, केमिकल गळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे.

तीन पैकी एका केमिकल कंपनीत जोरदार स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीत आत्तापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button