अरुणाचल प्रदेशसाठी विमानतळ बांधणार केंद्राच्या निर्णयामुळे चीनला मोठी चपराक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-1110.jpg)
नवी दिल्ली – विस्तारवादी चीनने अजुनही अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. हा भाग वादग्रस्त असल्याचे चीन कायम सांगत आला आहे. भारताचा कुठलाही मोठा नेता या भागात गेला की चीन त्याला आक्षेप घेतो.मात्र आता चीनच्या या दाव्यांना कवडीचीही किंमत नाही हे भारत दाखवून देणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशात ग्रिनफील्ड विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे चीनला मोठी चपराक बसली आहे.
राजधानी ईटानगरपासून १५ किमी दूर असलेल्या होलोंगी येथे हे विमानतळ उभारण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक असा हा विमानतळ असणार असून त्यावर ६५० कोटी खर्च केले जणार आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टिने हा भाग संवेदनशील आहे. त्याची सगळी काळजी घेऊन हा विमानतळ तयार करण्यात येणार आहे. ऊर्जेचा कमीत कमी वापर करत पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. २०० प्रवाशांची क्षमता या विमानतळाची असणार आहे. सर्व अत्याधुनिक व्यवस्था इथे राहणार असून सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.