breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सर्व आरोपांमधून मुक्तता, या संकटातून बाहेर पडणारे तिसरे राष्ट्रपती

वॉशिंग्टन | अमेरिकी संसदेच्या वरच्या सभागृहात बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगच्या सर्व आरोपातून मुक्तता झाली. ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग आणि संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. सीनेटमध्ये रिपब्लिकन्स(ट्रम्प यांचा पक्ष) बहुमत आहे. यामुळे ट्रम्प यांना सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपाखाली 52-48 तर संसदेच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली 53-47 मते मिळाली. महाभियोगाच्या संकटातून बाहेर पडणारे ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.

संसदेतून आरोपमुक्त झाल्यानंतर व्हाइट हाउसच्या प्रवक्ता स्टेफनी ग्रीशम यांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सर्व आरोपातून मुक्तता मिळाली आहे. हे एक प्रकारच्या पुनर्स्थापनेसारखे आहे. डेमोक्रेट्सची लज्जास्पद वागणूक ही आता भूतकाळातील गोष्ट आहे.” डेमोक्रेट्स आगामी राष्ट्रपती निवडणुकीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रीशम यांनी केला. यामुळे डेमोक्रेट्सविरोधात कारवाई होऊ नये का? असा सवाल ग्रीशम यांनी यावेळी विचारला.

अमेरिकेच्या 243 वर्षांच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाची प्रक्रिया होण्याची तिसरी घटना होती. यापूर्वी 19 व्या शतकात अँड्र्यू जॉनसन आणि 20 व्या शतकात बिल क्लिंटन यांच्या महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. तर 21 व्या शतकात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली. दरम्यान यापूर्वीच्या दोन राष्ट्राध्यक्षांवर त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात महाभियोगाचा प्रस्ताव आणला होता. तर ट्रम्प यांच्या पहिल्याच कार्यकाळात महाभियोगाचा प्रस्ताव आणला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button