breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम – अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे.

लुईस ग्लूक या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. ७७ वर्षांच्या लुईस ग्लूक यांना याआधीदेखील अमेरिकेत साहित्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे वंशाचे लेखक पीटर हँडका यांनी साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नाविन्यपूर्ण लेखन आमि भाषेतील नवीन प्रयोगाची दखल घेत त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button