Breaking-newsताज्या घडामोडी
अमरावती । केंद्र सरकारच्या निषेधार्त मुंडन आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Mundan.jpg)
अमरावती । आज अमरावती येथे मुस्लिम संघटनेनं केंद्र सरकारनी आणलेल्या सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यावेळी सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. CAA,NRC व NPR च्या विरोधात भारतीय संविधान सुरक्षा संघर्ष समितीच्या वतीने आज अमरावतीच्या ईविन चौक येथे सत्याग्रह आंदोलनामध्ये राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषद व विदर्भ उर्दू साहित्य समितीच्या वतीने हे मुंडन आंदोलन करण्यात आलं.
हा कायदा भारताचे विभाजन करणारा काळा कायदा असून याला रद्द करावा ही मागणी आंदोलकांनी यावेळी केली.