Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अपघातामध्ये इस्रोच्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
मोराई | महाईन्यूज
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनिअरचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. पुगझेंती (४५) असे या इंजिनिअरचे नाव आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावाचे ते रहिवासी होते. तिरुअनंतपूरममधील इस्रोच्या केंद्रामध्ये ते काम करत होते.
मंगळवारी दुपारी मोराई येथील आऊटर रिंग रोडवर झालेल्या अपघातात पुगझेंती यांचा मृत्यू झाला. त्यांची दुचाकी स्टेशनअरी पिकअप वाहनावर जाऊन धडकली व पुगझेंती यांनी हेल्मेट घालूनही त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघाताच्यावेळी पुगझेंती यांची दुचाकी प्रचंड वेगामध्ये होती असे पोलिसांनी सांगितले आहे.