breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना 1 सप्टेंबरपासून जारी; काय सुरु होणार ? आणि काय बंद हे पहा…

1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक 4 साठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार केंद्र काही गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या मार्गदर्शक सूचना लागू असणार आहेत…

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहे. कोरोनाचे रोज नवीन हजारो रुग्ण आढळून येत आहेत. तसंच करोना आतापर्यंत देशात शेकडो नागरिकांचा बळी घेतला आहे. सध्या देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ३५ लाखाच्या जवळपास पोहोचली आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयाने शनिवारी अनलॉक – 4 मार्गदर्शक सूचना जारी केल्या. येत्या ७ सप्टेंबरपासून देशभरात मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. मेट्रोसह अनलॉक – 4 मध्ये आणखी काय सुरू होईल आणि काय बंद असेल ते जाणून घेऊया…

काय सुरु होणार ?

  • मार्गदर्शक सूचनांनुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
  • २१ सप्टेंबरपासून १०० नागरिकांची उपस्थिती असेल असे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करता येतील. अशा कार्यक्रमांमध्ये किंवा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग करणं बधनकाकर असेल
  • ओपन एअर थिएटर २१ सप्टेंबरपासून खुली करण्यास परवानगी आहे
  • २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत येण्याची परवानगी
  • २१ सप्टेंबरपासून शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ऐच्छिक आधारावर (कंटेन्मेंट झोन बाहेरील) ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल
  • २१ सप्टेंबरपासून तांत्रिक आणि व्यवसायिक शिक्षण असलेल्या म्हणजे ज्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक आहे उच्च शिक्षण क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू होणार आहेत.

काय बंद असणार ?

  • कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन कायम असेल. तिथल्या नियमांमध्ये कुठलेही शिथिलता दिली जाणार नाही. कंटेनमेंट झोनमधील नियम सक्तीने पाळले जातील.
  • चित्रपटगृह, इंटरनेट पार्क
  • स्विमिंग पूल बंदच राहतील
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button