breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

अदानी-अंबांनी यांच्यात ‘नो पोचिंग’ करार, कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कंपनीत नो एन्ट्री’

अदानी-अंबांनी यांच्यात ‘नो पोचिंग’ करार, कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कंपनीत नो एन्ट्री’

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

व्यावसायिक क्षेत्रात आता आणखी एक परदेशी संकल्पना भारतात रुजू होत आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबांनी यांनी नो पोचिंग ही संकल्पना भारतात आणली असून यासंदर्भात या दोन्ही कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आहे. यानुसार,अदानी समूहाचे कर्मचारी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकणार नाहीत. तसंच, मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीतील कर्मचारी अदानी समूहात काम करू शकणार नाहीत. या करारालाच नो पोचिंग असं म्हणतात.

टॅलेंट वॉर आणि पगारवाढीसाठी कर्मचारी सतत नोकऱ्या बदलत असतात. आपल्याच क्षेत्रात वारंवार नोकऱ्या बदलत गेल्याने चांगली हाईकसुद्धा मिळते. मात्र कंपन्यांना याचा तोटा होत असतो. कर्मचारी आपली कंपनी सोडून आपल्याच प्रतिस्पर्धी कंपनीत रुजू होते, यामुळे आपल्या कंपनीतील टॅलेंट दुसऱ्या कंपनीत गेल्याने कंपनीला हानी पोहोचू शकते. हाच प्रकार टाळण्यासाठी अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीने नो पोचिंग हा करार केला आहे. यानुसार, अदानी समूहातील कर्मचाऱ्यांना रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये नो एन्ट्री असेल, तर रिलायन्स इंडस्ट्रीतील कर्मचारी अदानी समूहात येऊ शकणार नाहीत. यामुळे एका कंपनीतील टॅलेंट दुसऱ्या कंपनीत जाऊ शकणार नाही. अदानी समूह आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे हा करार झाला असल्याचं सांगण्यात येतंय.

रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये विविध व्यवसायात ३.८० लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. तर, अदानी समूहातही लाखो कर्मचारी कार्यरत आहेत. नो पोचिंग करारामुळे या दोन्ही समूहाच्या लाखो कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. नो पोचिंगसारखे करार हे अनौपचारिक राहतात. असे नियम न्यायालयात फार काळ टिकत नाहीत, असं अनेक कायदेतज्ज्ञ सांगतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी काही प्रकरणांमध्ये तक्रार मागेही घेतली जाते. त्यामुळे येत्या काळात भारतात नो पोचिंगची संकल्पना रुळली तरी त्याची किती अंमलबजावणी होईल, याची शाश्वती नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button