breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई | अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा सोमवारी २२ तारखेला पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यानंतर आता राज्य सरकारनेही २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक व्हिआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते,उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

हेही वाचा    –    पिंपरी, आकुर्डीमधील प्रधान आवास योजना ‘लॉटरी’ला अखेर ‘मुहूर्त’

महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम व ओडिशा या राज्यांनी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button