breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : चेन्नईवर दिल्लीचा जोरदार विजय

दुबई – पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे शुक्रवारी झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. दिल्लीचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला, तर चेन्नईचा दुसरा पराभव ठरला आहे.
या सामन्यापूर्वी दिल्लीपेक्षा चेन्नईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. मात्र दिल्लीच्या युवा खेळाडूंची दमदार कामगिरी या सामन्यात पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सपुढे १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. त्यानंतर चेन्नईच्या सलामीवीरांकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. परंतु या सामन्यातही चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना चांगली फटकेबाजी करता आली नाही.

सुरुवातीला चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दिल्लीचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी सावध सुरुवात करत हळूहळू दिल्लीच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केले. पृथ्वी आणि शिखर यांनी संघाला ९४ धावांची सलामी दिली. परंतु चेन्नईचा फिरकीपटू पीयुष चावलाने ही जोडी फोडली. शिखरने २७ चेंडूंत ३५ धावा केलेल्या असताना पीयुषने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर पृथ्वी शतक झळकावणार असे वाटत होते. मात्र पीयुषने धवनला बाद केल्यावर आपल्या पुढच्याच षटकात पृथ्वीलाही माघारी धाडले. पृथ्वीने यावेळी ४३ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६४ धावांची खेळी केली होती. अखेर दिल्लीने दिलेले १७६ धावांचे आव्हान चेन्नईला गाठता आले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button