breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG 1st test: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर या कसोटीतील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. आज सामन्याला सुरुवातीला इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी चेन्नईच्या चेपॉक मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, या मालिकेत भारताने मोठा विजय मिळवणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक कसोटी विश्चचषक. भारताला जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी विश्चचषक (विश्व टेस्ट चॅम्पियनशिप) (डब्ल्यूटीसी)च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध मालिकेत कमीत कमी दोन कसोटी जिंकणे आवश्यक आहे. इंग्लंड विरोधात जर भारताने 1-0 ने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियासाठी फायनलला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे घरच्या मैदानावर इंग्लंडला 2-0 ने हरवणे आता भारताला अत्यावश्यक झाले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंड डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्वीट करत या संबंधित महत्त्वाची माहिती दिली की, भारतीय संघाला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर इंग्लंडविरोधात चार कसोटी सामन्यांमध्ये कमीत कमी 2-0 ने विजय आवश्यक आहे. 2-1, 3-0, 3-1 अथवा 4-0 ने मिळवलेला विजय अधिक सुरक्षित असेल. त्याउलट जर इंग्लंडने 3-0, 3-1, 4-0 ने मालिका जिंकली तर त्यांना विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची संधी मिळेल. तसेच भारत जर केवळ 1-0 ने जिंकला किंवा इंग्लंड जर 1-0, 2-0 किंवा 2-1 अशा फरकाने जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचेल किंवा जर ही मालिका 0-0, 1-1 अथवा 2-2 ने बरोबरीवर सुटली तरीही ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडसोबत फायनलची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी ही कसोटी मालिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button