breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजनराजकारण

Indrayani Thadi- 2023 : ‘इंद्रायणी थडी’त आमदार लांडगे यांचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेट’

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख

महोत्सवातून दिला सुसंस्कृत राजकारणाचा संदेश

पिंपरी : महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने आयोजित ‘‘इंद्रायणी थडी- २०२३’’ महोत्सवातून आमदार महेश लांडगे यांनी ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चा संदेश दिला आहे. या महोत्सवात पिंपरी-चिंचवड शहरासह शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे.
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर तब्बल १७ एकर जागेत भव्य इंद्रायणी थडी महोत्सव आजपासून सुरू होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवांजली सखी मंच्या पुढाकाराने होणाऱ्या या महोत्सवामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय शहराध्यक्षांचा ‘‘सन्मानीय उपस्थिती’’ म्हणून निमंत्रण पत्रिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षांचा समावेश आहे.
तसेच, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्याही नावाला उल्लेख आहे. तसेच, भाजपा सत्ताकाळातील पाच वर्षांतील स्थायी समिती सभापती, महापौर यांचा ‘‘स्वागतोत्सूक’’ म्हणून पत्रिकेत उल्लेख केलेला आहे.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्वपक्षीय आमदार, आजी-माजी खासदार, पदाधिकारी, नेते यांना ‘इंद्रायणी थडी’ ला निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे महोत्सवात राजकारण नाही…अशी आमदार लांडगे आणि शिवांजली सखी मंचने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.

भाजपा युवा मोर्चाचा ‘‘लांडगे पॅटर्न’’
पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पटलावर ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ हा विधायक विचार सर्वप्रथम आमदार महेश लांडगे यांनी मांडला. त्याची राज्यभरात चर्चाही झाली. हा विचार पुढे चालवण्याचा वसा आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ‘‘इंद्रायणी थडी’’ च्या निमित्ताने लांडगे यांनी निमंत्रण पत्रिकेवर सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते यांच्या नावांचा उल्लेख केला. या पत्रिका सर्व नेत्यांना वाटप करण्यासाठी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहर आणि शिरुर लोकसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, सरचिटणीस दिनेश यादव, मंडल प्रमुख उदय गायकवाड यांच्यासह सहकाऱ्यांनी आमदार लांडगे यांचा सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


‘‘इंद्रायणी थडी- २०२३’’ हा महोत्सव महिला सक्षमीकरणासाठी सुरू झाला आहे. याद्वारे महिला उद्योजक, कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामध्ये राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. राजकीय विचारसरणी वेगळी असली, तरी सर्वपक्षीय नेत्यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत योगदान म्हणून उपस्थित रहावे, अशी आमची भावना आहे. त्यासाठी आमदार लांडगे यांचा ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ हा विचार सर्वपक्षीय नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
– शिवराज लांडगे, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button