breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

पाचव्या कसोटीतही भारताने इंग्लंडला लोळवलं, मालिका ४-१ ने जिंकली!

INDvsENG | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे पार पडला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि ६४ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विने सर्वाधिक ९ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करत २५९ धावांची आघाडी घेतली. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकं झळकावली. रोहित शर्माने १०३ धावा केल्या. तर शुभमन गिलने ११० धावांचे योगदान दिले. याशिवाय देवदत्त पडिक्कल आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतक केले.

हेही वाचा    –    ‘तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो’; प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान 

दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९५ धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात भारतासाठी अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने ५ फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button