breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-कॅनडा सामना पावसामुळे होणार रद्द? काय आहेत हवामान अंदाज

T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पहिल्या फेरीमधील भारतीय संघाचा अखेरचा सामना कॅनडाविरुद्ध शनिवारी (१५ जून) होणार आहे. हा सामना फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे.

हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, या सामन्याच्या निकलाचा फार मोठा परिणाम भारतीय संघावर होणार नाही. कारण भारतीय संघाने आधीच पहिले तिन्ही सामने जिंकत सुपर-८ फेरीत स्थान पक्के केले आहे. पण असे असले तरी सुपर-८ फेरीपूर्वीचा हा अखेरचा सामना असल्याने काही प्रयोग करण्याच्यादृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे.

हेही वाचा      –      ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार 

मात्र सध्या अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर पावसाचे सावट आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण आहे. त्याचमुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

दरम्यान, रिपोर्टनुसार सामन्याच्या वेळेदरम्यान ५० टक्क्याहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्याचमुळे आता जर या अंदाजानुसार पावसाचा अडथळा सामन्यात आला, तर कदाचीत काही षटकांचा खेळ कमी होऊ शकतो किंवा अधिक काळ पाऊस राहिला, तर सामना रद्दही केला जाऊ शकतो.

तथापि, भारतीय संघाने जरी सुपर-८ मधील प्रवेश पक्का केला असला, तरी कॅनडा शर्यतीत कायम आहेत. मात्र, जर शुक्रवारी अमेरिकेने आयर्लंडला पराभूत केले किंवा त्यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र कॅनडाचे आव्हान संपेल.

पण जर अमेरिका आयर्लंड विरुद्ध पराभूत झाले, तर कॅनडाला शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे.

दरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button