breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना-भाजपा राडाप्रकरणी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक करत संताप व्यक्त केला. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिले होते. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

का धुळ्यात राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर आंदोलन केले. यावेळी शहरात मंत्री राणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा गुरुशिष्य स्मारकाजवळ आली असताया चौकात भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर गोळा झालेले भाजपा कार्यकर्ते व शिवसैनिकांत घोषणाबाजी, शिवीगाळ तसेच दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या 136 कार्यकर्त्यांविरोधात स्वतंत्रपणे शासकीय कामात अडथळा व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नाशिक शहरातही काल दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले होते. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. तसेच राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात 100 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील काही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली असून काहींचा शोध सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button