breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हाडांच्या आरोग्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

Health Care News | निरोगी आणि सशक्त शरीराकरिता कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियममुळे हाडे बळकट होतात. त्यांना ताकद मिळते. तसेच ह्रदय, स्नायू आणि मज्जातंतूच्या आरोग्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात, दुखतात. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.

पालक : पालकामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करणे फायद्याचे असते. सर्वात महत्वाचं म्हणजे पालक खाल्ल्याने हाडांना २५ टक्के कॅल्शियम मिळते.

हेही वाचा     –    जामनेरमध्ये शेखच सिकंदर अन् चौधरीचाच विजय 

दही : दहीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दुधापेक्षा जास्त दही खाल्ल्यास कॅल्शियम जास्त मिळते. त्यामुळे हाडांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असल्यास आहारात दुधाचा समावेश करावा.

अननस : अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय अननसामध्ये पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते.

बदाम : व्हिटॅमिन ई सोबतच प्रथिने, झिंक आणि कॅल्शियम देखील बदामामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम केवळ मेंदूच तीक्ष्ण बनवत नाही तर हाडेही मजबूत करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button