ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद!

धायरीत जंगी स्वागत : बारामती मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधीकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या विरोधी उमेदवार, महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रचारात अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे. रोज गावभेटी देणे, नागरिकामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम सुनेत्रा पवार करत आहेत. अशातच आज त्या धायरी दौऱ्यावर असून धायारीतील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पुण्यातील उष्णतेचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. मात्र रखरखत्या उन्हातही सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्यासाठी धायरीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात सुनेत्रा पवार यांचे धायरीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी धायरीतील रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते. सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सामाजिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, धायरी येथील उद्योजक यशवंत कांबळे आणि हेमंत कांबळे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.  तसेच उद्योजक संतोष कदम यांच्या व्यंकटसाई होंडा शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी कदम व त्यांच्या संपूर्ण स्टाफने सुनेत्रा वाहिनींचे  आपुलकीने स्वागत केले. मनसेच्या माजी नगरसेविका युगंधरा चाकणकर यांच्या धायरी येथील संपर्क कार्यालयास पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सनी चाकणकर, सुहास चाकणकर, विक्रम चाकणकर, संतोष कदम यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या घटक पक्षातील एक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे आभार मानले.

धायरी गावचे माजी सरपंच, श्री धायरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, खजिनदार केशवराव रायकर यांच्या धायरी येथील निवासस्थानी पवार यांनी सदिच्छा भेट दिली. 91 वय वर्ष असूनही केशवराव रायकर यांची उत्तम, ठणठणीत प्रकृती आहे. श्री धायरेश्वराची त्यांच्यावर असणारी ही कृपाच. त्यांनी गावाचा कारभार पाहताना गावाला जसे प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने देवस्थान ट्रस्टचा कारभार करताना अत्यंत काटेकोरपणे शिस्तबद्धपणे केला. त्यांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या याच प्रयत्नातून आज देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. स्वतःच्या भल्या मोठ्या एकत्रित कुटुंबालाही त्यांनी एका धाग्यात गुंफले आहे. अशा या वंदनीय व्यक्तिमत्त्वाची झालेली भेट ऊर्जा देणारी ठरली असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.  यावेळी विजयकुमार रायकर, गणेश रायकर, राजेंद्र रायकर व सर्व रायकर कुटुंबीयांनी माझ्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यासोबतच प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक यांच्या निवासस्थानी पवार यांनी  सदिच्छा भेट दिली. तसेच  उद्योजक बापू विठ्ठल रायकर, कृष्णात मुरकुटे,  योगीराज आणि औदुंबर सोसायटी व चंद्रनील सोसायटीतील रहिवाशांनी आमच्या सर्वांच्या मनात “घड्याळ” फिक्स असल्याचे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांना  दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button