breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात मद्यधुंद तरूणीचा राडा, महिला पोलिसांना मारहाण!

पुणे : ३१ डिसेंबरला पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक हॉटोल्स हाऊसफुल्ल होते. अनेक ठिकाणी लोक नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यातच धिंगाण्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. यातच पुण्यामध्ये एका मद्यधुंद तरुणीनं चांगलाच राडा घातला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत ३१ डिसेंबर च्या रात्री ही घटना घडली. मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली. प्रकरण सहन होण्याच्या पलीकडे गेल्याने सोसायटीतील रहिवाश्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं.

हेही वाचा    –    काळभोरनगर, मोहननगर परिसरातील नागरिकांसाठी जिजाऊ क्लिनिक सुरू करा!

पोलीस सोसायटीत दाखल झाले. त्यात महिला पोलीसही होत्या. त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी समजण्यापलीकडच्या अवस्थेत गेली होती. दारुच्या नशेत या तरुणीनं महिला पोलिसांना देखील मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तसेच तिने सोसायटीच्या मालमत्तेचीही तोडफोड केल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button