TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

महाराष्ट्रात भाजप ४० जागा कशा जिंकणार, असे असणार विनोद तावडेंचं लोकसभेला ४० जागा जिंकण्याचं मतांचं गणित…

मुंबईः
महाराष्ट्राच्या राजकारणापासून जवळपास चार वर्षे दूर राहिलेले भाजपचे नेते, विनोद तावडे राज्यारपासून दूर झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात कार्यरत झाले. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती झाली. नुकतीच त्यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप ४० जागा कशा जिंकणार आहे, त्याचे गणित सांगितले.

भाजपचा मोठा निर्णय : खासदार अन्‌ विधान परिषदेच्या आमदारांना उमेदवारी नाही
विनोद तावडे म्हणाले,”महाविकास आघाडीला नक्कीच कापता येऊ शकतं. मला वाटतं की, मुळात सर्व्हे आता होतो ते, राज्यातल्या राजकीय घडामोडींवर होत असतो. २०१४ ची विधानसभा निवडणुका पाहिली तर भाजप वेगळा लढला, शिवसेना वेगळी लढली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली. त्यावेळी भाजपला २९ ट्क्के मते होती, शिवसेनेला १९ टक्के मते होती. काँग्रेसला १८ आणि राष्ट्रवादीला १७ ट्क्के मते होती. आता ही टक्केवारी पाहिली होती. शिवसेनेच्या १९ टक्के मतांमध्ये ९ ते १० टक्के मते ही हिदुत्त्ववादी मते आहेत.”

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ? ; आजच्या मेळाव्यात नेमकं काय बोलणार ?
तावडे पुढे म्हणाले, “शिवसेना ज्या पद्धतीने राम मंदीराला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत गेली. हिंदु्त्त्वाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. त्यामुळे शिवसेनेची १० टक्के मते हिंदुत्वामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे होती, ती शिवसेनेपासून वेगळी होऊ शकतात. आणि ती व्हायला लागलेली आहे. ती मते जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मिळवता आली, तर एकदम लोकसभेच्या २९ जागांवरून भाजप ३९ जागांपर्यंत जाते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरिब कल्याण कार्यक्रम आहे, यामुळे ४ ते ५ टक्के गरिबांची मते नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळायची ती भाजपकडे आली, तर भाजप एकदम ४४ ते ४५ टक्के मतांपर्यंत जातो. त्यामुळे मला वाटतं की, लोकसभेला एक वेगळं चित्र दिसेल.”

“आगामी लोकसभा निवडणुकीत जर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यापैकी निवड असेल तर स्वाभाविकपणे, ग्राऊंडचा बेस आणि नेतृत्तावाचा फेस, यावर भाजप लोकसभा निवडणुका जिंकू शकतो, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button